मंडळाचा इतिहास
संस्थेची स्थापना : १८ जून १९१६
आद्य संस्थापक : कै. लक्षमण पांडूरंग तथा आण्णासाहेब जोशी
संस्थापक साहाय्यक : कै. गणेश केशव तथा मामासाहेब साने
कै. विनायक लक्ष्मण भावे ( महाराष्ट्र सारस्वतकार )
कै. नारायण गोविन्द अत्रे, चिटणीस
कै. दामोदर परशराम वैद्य, खजीनदार
उद्देश : हुशार व गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांना
उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता
महाविद्यालयीन शिक्षणासाठी
परदेशी शिक्षणासाठी
दरवर्षी शिष्यवृत्या देणे
उद्देशपूर्ती : देणग्या व विद्यार्थ्यांकडून आलेली परतफेड यातून विद्यार्थ्यांना साहाय्य केले जाते.

शिक्षणाचा प्रचार व प्रसार वाढला तरच भावी विज्ञानयुगात आपल्या समाजाचा टिकाव लागेल हे कै. लक्ष्मण पांडुरंग तथा आण्णासाहेब जोशी यांनी ओळखले. विद्यार्थ्यांना आर्थिक मदती अभावी शिक्षण थांबवावे लागू नये यासाठी त्यांनी त्यांचे स्नेही कै. नारायण हरी उर्फ बंडोपंत राखे यांच्या सहकार्याने ' ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ, ठाणे ' या संस्थेची स्थापना केली.
वरील विभूतींनी लहान प्रमाणात सुरू केलेल्या या कार्याचा गेली ९५ वर्षे विस्तार वाढत जाऊन संस्था शतक महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपल्या समाजाची उन्नत्ती साधण्यासाठी दूरदृष्टी राखून हुशार व लायक विद्यार्थ्यांस उच्च शिक्षणास साहाय्य करण्यासाठी या संस्थेची स्थापना ज्या महाभागांनी केली त्यांना शतशः वंदन.
संस्था स्थापन करण्याइतकीच, किंबहुना काकणभर जास्तच, ती टीकवण्याची जबाबदारी कठीण असते. सरूवातीच्या काळात २ विद्यार्थ्यांना मॅट्रीकची फी भरता यावी यासाठी चार, आठ आणे वर्गणी ज्ञातीबांधवांकडून जमवून द्यावी लागल्याची हृदय आठवण सांगीतली जाते.
सुरूवातीला फक्त पुरूष विद्यार्थांना मदत देण्यात येत असे, ते धोरण व्यापक करुन स्त्री विद्यार्थ्यांनाही मदत देण्यास सुरूवात झाली. हळूहळू संस्थेची वाटचाल रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव, अमृतमहोत्सव व आता नजरेच्या टप्प्यात आलेला शतकमहोत्सव अशी सुरूच आहे. वेळोवेळी झालेल्या महोत्सवात खालील थोर महापुरूषांनी अध्यक्षपद भूषविले व संस्थेच्या कार्यासाठी मार्गदर्शन करून शुभाशिर्वाद दिले त्याचेच हे फळ होय.

१. भारतरत्न प्रा. पांडुरंग वामन काणे
२. श्रीमद्जगद्गुरू श्री शंकराचार्य, डॉ. कुर्तकोटी
३. साहित्यासम्राट देशभक्त श्री. नरसिंह चिंतामण केळकर
४. नाट्याचार्य देशभक्त श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
५. देशभक्त श्री. बाळ गंगाधर खेर, मुंबई सरकारचे माजी पंतप्रधान
६. डॉ. रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे ( रॅंगलर)

   संस्थेच्या स्थापनेपासून वर्षानुवर्षे, मंडळाची धुरा सांभाळणा-या कार्यकर्त्यांविषयी थोडेसे :
१. कै. विश्वनाथ लक्षमण जोशी : १९१६ ते १९४३ संस्थेचे कार्यकर्ते या काळात संस्थेची कचेरी त्यांच्या घरी होती.
२. कै. दामोदर परशराम वैद्य : साहाय्यक संस्थापक व सुरूवातीचे काळात खजीनदार
३. कै. परशराम दामोदर वैद्य : खजीनदार, टापटीप,चोख व्यवहार व स्पष्टवक्तेपणाविषयी लौकीक होता.
४. कै. डॉ. शिवराम महादेव जोशी : १९४२ ते १९६७ व्यवस्थापक मंडळाचे कार्यकर्ते, १९४२ ते १९५२ या काळात संस्थेची कचेरी यांच्या घरी होती.
५. कै. गजानन विष्णू उर्फ गजूकाका वैद्य : १९३५ ते १९७९ सतत ४४ वर्षे खजीनदार, संस्थेचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी अत्यंत तळमळीने कार्य केले.
६. कै. कृष्णाजी रामचंद्र गोडबोले : अनेक वर्षे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, परतफेडीसाठी विद्यार्थ्यांबरोबर पत्रव्यवहार केला त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
७. कृष्णाजी पुरूषोत्तम जोशी : सुरूवातीच्या काळात दप्तर व्यवस्था पाहिली.
८. कै. विश्वनाथ नारायण केळकर : सुमारे ४० वर्षे संस्थेचे दप्तर व दैनंदिन कामकाज केले. संस्थेची कचेरी १९५२ ते १९६७ यांच्या घरी होती.
९. कै. कृष्णाजी नरहर गोगटे : १९७२ ते १९९१ सतत १९ वर्षे चिटणीस
१०. कै. दत्तात्रय काशीनाथ आपटे : अनेक वर्षे कोषाध्यक्ष, पत्रव्यवहारासाठी यांचाच पत्ता दिला जात असे.
११. कै. ग. ल. जोशी : संस्थेसाठी देणग्या जमविण्यात सतत पुढाकार घेतला.
१२. कै. विनायक हरी जोशी : १९६४ पासून सुमारे ३० वर्षे जमाखर्च लिहिणे व दैनंदिन कामकाज पाहिले.
१३. कै. गोविंद नारायण पेंडसे : १९८१ पासून १५ वर्षे दप्तर व्यवस्थेचे प्रमुख, १९८३ मध्ये संस्थेच्या नियमात दुरूस्ती करण्यात यांचे अनुभवी नेतृत्व मोलाचे ठरले.
१४. कै. मनोहर शंकर जोशी : ह्यांनी स्वत: मंडळाचे साहाय्य घेतले होते. त्यांनी संस्थेचे कार्य अतिशय तळमळीने केले. ते अनेक वर्षे संस्थेचे कार्यवाह होते.
१५. कै. भास्कर कृष्ण देव : यांनीही अनेक वर्षे कोषाध्यक्ष म्हणून काम केले. संस्थेला सर्वतोपरी मदत केली.

   गेल्या ९५ वर्षात कित्येक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी वर्षानुवर्षे संस्थेकरीता तळमळीने कार्य केले व संस्थेचा हा जगान्नाथाचा रथ इतक्या प्रदीर्घ कालखंडात गतिमान होत राहीला. याच कालखंडात संस्थेने दोन जागतिक महायुध्ये, भारताचे स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ इतकी स्थितंतरे पाहिली. तरीसुद्धा मंडळाचे प्रतिवर्षीचे कार्य अबाधितपणे सुरूच राहिले. त्याला कारण याच व्यक्तींची दुर्दम्य कार्यशक्तीच नव्हे काय? अशा सर्व कार्यकर्त्यांच्या व देणगीदारांच्या स्मृतीस कृतज्ञतेने व आदराने अभिवादन.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद : गेल्या ९५ वर्षात परतफेड न आल्याचे एकही उदाहरण नाही.

एक विनम्र आवाहन : आपल्या ज्ञातीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना अधिकाधिक साहाय्य उपलब्ध होण्यासाठी व ज्ञातीच्या उत्कर्षासाठी तसेच संस्थेच्या अभिवृद्धीसाठी आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता लक्षात घेऊन सहकार्य करावे ही विनंती.