१८ जून १९१६ रोजी कै. लक्ष्मण पांडुरंग तथा अण्णासाहेब जोशी यांनी विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षण थांबवावे लागू नये म्हणून सदर संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला २ विद्यार्थ्यांना मॅट्रिकच्या शिक्षणाकरिता (फॉर्म फी) मदत केली. त्यांच्या मदतीला कै. गणेश केशव तथा मामासाहेब साने, कै. नारायण गोविंद अत्रे, कै. दामोदर परशुराम वैद्य आणि महाराष्ट्र सारस्वतकार कै. विनायक लक्षमण भावे धावून आले. सुरुवातीला मंडळाचा कारभार सदस्यांच्या घरुनच चालत असे. १९६७ साली मंडळाचे आत्ताच्या म्हणजे ब्राह्मण सभेच्या जागेत कार्यालय सुरु झाले.

अधिक माहितीसाठी पुढे वाचा....