नियम व अटी

१. फक्त महाराष्ट्रीय (मराठी भाषीक) ब्राह्मण जातीच्या चार पोट शाखेतील (कोकणस्थ, देशस्थ, क-हाडे व देवरूखे) विद्यार्थ्यांस शिक्षणासाठी साहाय्य केले जाते.
२. सर्व शैक्षणीक साहाय्य (Educational Loan) ही परतफेडीची आहेत. विद्यार्थ्यांनी त्याची समाधानकारक परतफेड केल्यास व्याज आकारण्यात येत नाही.
३. सन १९१६ पासून हुशार व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी साहाय्य दिले जाते.
४. विद्यार्थ्याने घेतलेल्या सर्व रक्कमेस विद्यार्थी व जामीनदार संयुक्तपणे अथवा वैयक्तीकरीत्या पुर्णपणे जबाबदार असतात
५. शिक्षण पूर्ण होईपर्यंत साहाय्य मिळते.
६. प्रतिवर्षी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून जुन्या व नवीन विदयार्थ्यांच्या मदत अर्ज्यांचा विचार करून मदत करण्यास प्रारंभ होतो.
७. प्रचलित नियमानुसार प्रत्येक विदयार्थ्यास परतफेड शिष्यवृत्ती मंजूर झाल्यावर मंडळाचे आजीव सभासदत्व स्वीकारावे लागेल.
८. संस्थेकडून शेवटचे साहाय्य घेतल्या दिनांकापासून ३ वर्षात संपूर्ण परतफेड होणे आवश्यक आहे. परतफेड सुलभ मासिक हप्त्यात स्वीकारली जाते.
९. आपणास देऊ केलेली मदत ही बिनव्याजी आणि परत करावयाची आहे. शेवटची मदत दिलेल्या तारखेपासून 3 वर्षांत परत करावयाची आहे.
१०. मुदतीत रक्कम परत न केल्यास, येणे रक्कमेवर द.सा.द.शे. ९% दराने पहिली मदत दिलेल्या तारखेपासून व्याज आकारले जाईल, तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे मंडळाचे अधिकार अबाधित राहतील.
११. कर्ज / मदतीच्या नियम व अटी मध्ये बदल करण्याचे पूर्ण अधिकार मंडळास असतील व वेळोवेळी असे केलेले बदल चालू असलेल्या कर्जास सुद्धा लागू होतील.
१२. परदेशी जाणा-या विद्यार्थ्यास रू. २,५०,०००/- पर्यंत परतफेडीचे साहाय्य दिले जाते.
१३. वर्ष २०१८-१९ पासून प्रतिवर्षी विद्यार्थ्यास द्यावयाच्या आर्थिक साहाय्यात वाढ करण्यात आली आहे. आर्थिक साहाय्य खाली नमुद केल्याप्रमाणे देण्यात येते.

  • इ. ११ वी व १२ वी करिता - रू. २०,०००/- पर्यंत
  • पदविका अभ्यासक्रम - रू. 3०,०००/- पर्यंत
  • कला, वाणिज्य, शास्त्र या पदवी व शिक्षणशास्त्र पदविका (D.Ed.) अभ्यासक्रमासाठी - रू. 3०,०००/- पर्यंत
  • अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण, वास्तूशास्त्र इ. पदवी अभ्यासक्रम व शिक्षणशास्त्र पदवी (B. Ed.) - रू. ४०,०००/- पर्यंत
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम - रू. ५०,०००/- पर्यंत
  • ईतर नवीन सुरू झालेल्या विद्याशाखांचासुद्धा विचार करण्यात येईल